संजय सोनवणी लिखित किस्त्रीम २००६ च्या दिवाळी अंकात आलेला एकच शंकराचार्य हवेत हा लेख वाचनात आला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि पोटतिडिकेने लिहिलेला हा लेख महत्त्वाचा आहे असे वाटते.
लेखात उल्लेखलेले अनेक मुद्दे पटले. शंकराचार्य आणि पीठे यांच्या विषयी अनेक प्रकारची माहिती दिली आहे. त्यातील भांडणे ही बाब नवीनच कळली. उद्या हिंदुच उरले नाहीत, तर ही मंडळी त्यांच्या आश्रमाचे काय करणार आहेत असा प्रश्नही माझ्या मनात आला. तात्कालीन फायद्यासाठी वापरून घेणारे राज्यकर्ते आणि त्यांना वापरू देणारे महंत ही कीड आपले मन उदास करून टाकते.आज
निर्नायकी स्वरूपात आलेला हा समाज एकत्र बांधलाच पाहिजे यात शंका नाही. एकतर अति मवाळ किंवा थेट त्रिशुळ नाचवत फिरणारे अतिरेकी, हे पाहिले की अतिशय वाईट वाटते. त्यात कोणत्याही घटनेचा फायदा घेवून हिंदुच कसे वाईट आहेत हे दाखवण्याचा परदेशी माध्यामांचा घाट पाहिल्यावर चीड येते. सर्बियातल्या अतिरेकी ख्रिश्चन कारवाया आणि मुस्लीम कत्तली, माध्यमातून शक्यतोवर पुसून टाकल्या जातात. ओरिसातले धर्मांतर म्हणजे यांना हक्क वाटतो. त्याला विरोध म्हणजे मानवतेला विरोध असतो. परदेशात ख्रिश्चन धर्माला पुढे आणण्यासाठी जे काही उपाय चालले आहेत ते पाहुन थक्क व्हायला होते. असा संघटित प्रयत्न आपण कधी करणार आहोत या विचाराने अस्वस्थ व्हायला होते.
आजच्या
घडीला भारतात ‘पिन कोड नुसार गाव तेथे चर्च‘ असा कार्यक्रम व्हॅटिकन व ऍव्हेंजलिस्ट चर्चने आखला आहे. उत्तर भारत हा हिंदु हब आधी निकामी केला पाहिजे, हा अजेंडा आखला गेला आहे. या साठी इन्कल्चरेशन नावाचे हत्यार वापरले जाते. म्हणजे सर्व व्यवहार हिंदुंप्रमाणेच करावयाचे पण त्यात हळूच ख्रिश्चनिटी गोवायची. त्यासाठी सर्व नावेही जाणीव पूर्वक हिंदु वापरायची. चर्च ला कृष्णालय म्हणायचे वगैरे वगैरे. असा ठराव भारतातील सर्व आर्च बिशप्स ने मिळून २००० साली केला आहे असे वाचण्यात आले. ही माहिती मला क्रुसेड वॉच नावाच्या एका संकेत स्थळावर मिळाली. बहुतेक माजी केंद्रिय मंत्री यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते.
कोरिया
या देशाची परिस्थिती पाहिल्यावर हे धर्मांतराचे लोण दूर नाही, याची जाणीवही अतिशय अस्वस्थ करते. परंतु त्यातही महर्षी महेश योगी, आनंद मार्ग किंवा चिन्मयानंद मिशन सारखी लोकं ही ज्योत अजूनही तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हीच समाधानाची बाब.
नरेंद्र महाराजांनीही धर्मांतरीत होवून ख्रिश्चन झालेले परत हिंदु करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी मोहिम घेतली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. या लेखनाला अजून प्रसिद्धी मिळायला हवी असे जाणवून गेले. तसेच हा लेख हिंदी भाषेतही प्रसिद्ध व्हावा असे वाटते. तो त्या त्या ‘ऑडियंस‘ पर्यंत पोहोचेल.
.
Filed under: Uncategorized