मराठी पुस्तके वाचन…

मराठी पुस्तके वाचन…

येव्हढ्यात मी शंकर पाटलांची चंची वाचलं.
शिवाय आरके लक्ष्मण यांचं लक्ष्मणरेखा वर्गीस कुरियन यांचं माझंही एक स्वप्नं होतं. पुस्तकं मस्तच आहेत.
स्वतंत्र्याच्या धामधूमीतही आर के लक्ष्मणांसारखी लोकं कोणतेच प्रकार अंगाला लावून न घेता, अलगदपणे राहूच शकत होती हे ही कुठे तरी जाणवून गेलं. चालायचंच! मी कोण त्यावर काही भाष्य करणारा, नाही का?

शिवाय अनेक लेकी आणि बाप यांचे मनोगत उलगडून दाखवणारे ‘बापलेकी’ वाचले. ‘बापलेकी’ हे जरा वेगळेच आहे…
त्यातही तेंडूलकरांनी लेकी विषयी आणि प्रियाने बापाविषयी हे लिखाण खासच…
एकुण पुस्तक आणि विषय छान आहे.
यात ना. सि. फडके यांच्या कन्या लिला पाटिल यांचाही लेख आहे. पण नेमका तोच लेख परत साप्ताहिक सकाळ मध्येही वाचण्यात आला. 

या शिवाय कुंटेंचं, नर्मदे हर पण वाचलं, मला तरी आवडलं!
असं अवली पणे फिरणं काही वेगळंच आहे, मजा आली वाचायला.
गो नि दांडेकरांसारखंच पण जरा वेगळं, चमत्कारिक!
त्यांचंच साधनामग्न वाचायचंय.

मी प्रतिभा रानडेंचे अफगाण डायरी पण वाचले, चांगले आहे. अफगाणीस्तानाची परत एकदा ओळख झाल्यासारखे वाटले.
पण पुस्तक मध्येच संपुन गेल्या सारखेही वाटले… अजून जरा असायला हवे होते.

यातले मी इतक्यात वाचलेल्यांपैकी भैरप्पा, लक्ष्मण, लिला पाटिल आणि कुरियन हे सगळे साधारण पणे एकाच कालखंडातले लेखक. पण प्रत्येकाच्या नजरेतून आयुष्य इतके वेगवेगळे आहे… बहुतेक प्रमुख घटनांचे संदर्भ तेच पण वेगवेगळ्या प्रकारे वाचायला खुप मजा येतेय/आली.

आता ‘माझं नाव भैरप्पा’ हे एस एल भैरप्पांचे उमा कुलकर्णींने भाषातंरीत केलेले अजून वाचतोच आहे.चासं वाचन चाललंय

शिवाय एका रानवेड्याची आणि वैशाली हळदणकर चे बारबाला पण यादीत आहे.

तुम्ही कोणती नवीन पुस्तके वाचली इतक्यात?

आपला
गुंडोपंत

तुमचा अभिप्राय नोंदवा