लेखन ही पण एक पाककृतीच असते

बहुतेक वेळा मराठी संकेत स्थळांवर लिखाण होतांना काहीतरी फालतूपणा आढळतो.
म्हणजे फक्त जे विचार आपल्याला पटतात तेच सगळ्यांनी मान्य करावे असे काहीतरी. मग भंगार चर्चा प्रस्ताव जन्माला येतात.

ना काही स्वतःचा अभ्यास नाही काही विचार. नुसतेच फालतुचे पोकळ वाद!
या प्रकाराला मी ही कंटाळलोय!!

मला वाटते  लेखन ही पण एक पाककृतीच असते. जमली नाही तर विचारांची चव बिघडते हे ही ध्यानात असु द्या!
तसेच पाक कृती मध्ये जसे जिन्नस, कृती असे तयार टप्पे दिलेले असतात, तसेच येथेही लेखनासाठीही द्यावेत.

1. लेखाचा सारांश
2. विषयाची ओळख
3. तुमच्या मुद्यावर आजवरचे इतरांनी मांडलेले विचार
4. तुमचे विचार
5. तुलनात्मक अभ्यास/विचार
6. अनुमान
7. पुढील संशोधन विचारांची दिशा
म्हणजे काही तरी बरे लेखन होण्याची शक्यता आहे…

अर्थात मी यावर लिहिणारा कोण लागून गेलो आहे म्हणा?

आपला
गुंडोपंत

तुमचा अभिप्राय नोंदवा