उपक्रमावर http://mr.upakram.org/node/1043 येथे चर्चा करतांना सदस्यांनीही अनेक उपाय सुचवले आहेत. हे उपाय महत्वाचे वाटल्याने मी त्यांचे संकलन केले व ते येथे देत आहे. या लेखनाचा मूळ हेतु पाहता सदस्यांचा आक्षेप नसेल अशी आशा आहे!

(आणि याउपरही आक्षेपच असेल तर माझ्या व्यायामशाळेत भेटा! ;) ))) )

प्रोझॅक – प्रश्न

नैराश्यावर बाहेरून औषधे घेणे हा उपाय काही कालावधीसाठी नक्कीच प्रभावी असतो. परंतु दीर्घकालीन उपायासाठी ध्याना सारखा उपाय नाही!
प्रोझॅक (किंवा तत्सम)च्या दीर्घ वापराने अनेक प्रश्न उभे राहतात. याची सवय लागू शकते.
मनाला कायमच्या कुबड्या देणे व फ्रॅक्चर झाले आहे ते बरे होई पर्यंत कुबड्या देणे यात खूप मोठा फरक आहे.
नैराश्याला ओळखून त्याला व्यवस्थित पणे हुलकावणी देवून अथवा त्याची खेळी खळून शेवटी आपल्या पायावर उभे राहणे महत्वाचे आहे.

मात्र सत्य हेच की हा नैराश्याचा भाग प्रत्येकाला ग्रासतच असतो. नैराश्य कधी ग्रासलेच नाही अशी व्यक्ती मिळणे शक्य नाही!

आपला
गुंडोपंत

——————————————-

विकास देशपांडे यांची वाक्ये,

“कधी कधी अशी उदासीनता का येते हे कळले नाही तरी स्वतःच्या बाबतीत डोळस असणार्‍या व्यक्तीस आपली ती “फेज” कधी चालू होत आहे हे सवयीने समजू शकते आणि त्यावर आपल्याला उल्हासीत करणारे उपायपण सुचू शकतात. बरेचसे उपाय वर गुंडोपंतांनी आणि इतरांनी सुचवलेले आहेत. त्यातील एक औषध घेणे हा उपाय सोडल्यास बाकी सर्व मान्य होतात. आता गंमत पहा प्रोझॅक घेतल्यावर डीप्रेशन जाते तर त्याचे साईड इफेक्टस हे त्यांच्याच संकेतस्थळावर सांगीतल्या प्रमाणे: nausea, difficulty sleeping, drowsiness, anxiety, nervousness, weakness, loss of appetite, tremors, dry mouth, sweating, decreased sex drive, impotence, and/or yawning ! म्हणजे आपण बिल माहरने परवाच म्हणल्याप्रमाणे आपण औषध बरे होण्यासाठी घेत आहोत का आजारी पडण्यासाठी हा मोठा प्रश्नच ठरतो! थोडक्यात शब्दशः रोगापेक्षा इलाज भयंकर…”

——————————————-

पुस्तक  

आमच्या घाटपांडे साहेबांनी सूचवलेले मनोविकारांचा मागोवा हे डॉ.श्रीकांत जोशी यांचे पुस्तक अतिशय उत्तम आहे.
मिळाल्यास जरूर वाच. अगदी संग्रही ठेवून अधून मधून वाचत राहण्यासारखे आहे हे.

विकास देशपांडे यांनी सुचवलेले डॉ. आनंद नाडकर्णी यांचे विषादयोग, स्वभाव विभाव 

——————————————-

जालावर मदतीचे दुवे 

निनाद यांनी सुचवलेले,

मदत उपलब्ध आहे.

<”http://www.beyondblue.org.au”> बियॉंड ब्ल्यु
<”http://www.reachout.com.au”> रिच आउट
<”http://www.itsallright.org”> इट्स ऑलराईट

चित्रा यांनी सुचवलेली,

http://www.nmha.org/go/information/get-info/depression/what-to-do-when-depression-enters-a-relationship

लिखाळ,

समुपदेशन + पुष्पौषधी (http://www.bachcentre.com/found/firstpag.htm)

——————————————- 

उत्साही लोकांमधे वावरणे हा पण चांगला उपाय आहे.

——————————————

प्रियाली यांनी सुचवलेले,

नैराश्य झटकून टाकण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट करणे.

——————————————

संजोपराव म्हणतात – डार्क चॉकलेट खाणे, शॉपिंग करणे

——————————————

 चित्रा यांनी सुचवलेले,

स्वतःच्या हाताने काही सर्जनशील गोष्टी करणे हा सुरेख उपाय आहे.
पण कधीकधी निराश मनस्थितीला धक्का मारून त्या रुतलेल्या ठिकाणातून बाहेर काढावे लागते. औषध तेंव्हा ते काम करते. पण त्याचाच अतिरेक झाला की मग काय होते याचा उहापोह आपण केला आहेच. म्हणूनच मी औषध मर्यादीत कालावधी साठीच असावे असे म्हणतो!

रूग्णाजवळच्या लोकांनी डिप्रेशनचा बाऊ न करता बोलले पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. डिप्रेशन डिप्रेशन खेळायची सवय नको लागायला. अनेकदा असे झालेले दिसून येते. थोड्या कणखर व सुस्प्ष्ट भूमीकेने हे सोडवता येते.

——————————————- 

फार आकर्षक असतो हा खेळ!

या व्याधीने कोण ग्रासले नाहीये?
पण किती ग्रासू द्यायचे हे तुमच्या हातातच आहे हे लक्षात ठेवा.

तपासून पहा!
मात्र उपाय करतांना नैराश्य व त्यावर मात हा खेळ काही दिवस सुरु राहील. आपल्याला निराश विचार येत आहेत हे ज्या क्षणी समजेल त्या क्षणी विचार तपासा की कुठून सुरु झाले हे विचार?
उदास विचारांचे बटन शोधा. कशामुळे ते बटन दाबले जाते ते शोधून काढा – निराशेतून लवकर बाहेर याल.

पण असं तर होत नाहीये ना? की हा खेळ आहे व ‘मी उदास आहे’ हा खेळ खेळायची चटक तुम्हाला लागली आहे?
फार आकर्षक असतो हा खेळ!

——————————————

आमच्या बिरुटे सरांनी सांगितलेले बाकीचे काही उपाय योग्य वाटले तरी,  

नैराश्यात एखादे-दोन पेगही घेऊन झालेले असतात हे फार डेंजरस सोल्युशन आहे! सर येवढे उदास मनस्थितीत नक्की टाळा. एक वेळ आनंदासाठी चालेल.

बाकी इतर आपल्याला मानवतील ते कोणतेही उपाय उत्तम. देवाचे ध्यान हा उत्तम उपाय आहेच.
मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक ध्यानाला बसा.

——————————————

 कोलबेर व धनंजय,  

‘हे ही दिवस जातील’ हा मंत्र नैराश्यावरील उत्तम उपाय!!

—————————————–

आपला
गुंडोपंत

तुमचा अभिप्राय नोंदवा