अरे हजार कल्पना तर लढवून पाहू…

अरे हजार कल्पना तर लढवून पाहू… 

आधी करून तर पाहू… किमान एका माणसाला (हो बस फॅक्टर १!!)
“काही घडवावेसे” वाटले ना की झाले.
जगातली बहुतेक सगळी उदाहरणे ही बस फॅक्टर १ वरच उभी राहीली आहेत. (नंतर जग आलं असेल त्यात, पण सुरुवात फक्त १ ने झाली आहे!)
अहिंसावादी चळवळ (बस फॅक्टर १ फक्त गांधीजी!)
बांगला देश चे स्वातंत्र्य (बस फॅक्टर १ फक्त इंदिरा गांधी)
भारतात संगणकाला आणणे व पाठपुरावा (बस फॅक्टर १ राजीव गांधी!)
संस्थाने भारतात विलिनिकरण मोहीम (बस फॅक्टर १ फक्त सरदार वल्लभ भाई पटेल)
पाकिस्तानचा जन्म (बस फॅक्टर १ फक्त जीना!)
राजकपूरचे चित्रपट (बस फॅक्टर १ फक्त राज कपूर – संस्था चालू पण तो करिष्मा नाही!)
दादा कोंडके (बस फॅक्टर १ फक्त दादा!)

ममा टीना व्हियेतनाम मधील कार्य (बस फॅक्टर १ फक्त ममा टीना!)
१९००व्या शतकात शिक्षण (बस फॅक्टर १ फक्त ज्योतिबा फुले!)
गावोगाव स्वच्छतेचे महत्व पटवणे (बस फॅक्टर १ फक्त गाडगे महाराज!)

उपक्रम (बस फॅक्टर १ फक्त शशांक जोशी)
मिसळपाव (बस फॅक्टर १ फक्त तात्या)
माझेशब्द (बस फॅक्टर १ फक्त राज जैन)

पब्लीकला येड्यात काढणे (बस फॅक्टर १ फक्त अनिरुद्ध बापु!)
पब्लीकला ‘आपले भक्त’ करणे (बस फॅक्टर १ फक्त नरेंद्र महाराज!)
पब्लीकला नादी लावणे (बस फॅक्टर १ फक्त सत्यसाईबाबा!)

तुफान मोठा रिलायंसचा व्यवसाय उभा करणे (बस फॅक्टर १ फक्त धीरुभाई)
संगित क्षेत्रात नव्या लोकांना संधी देणारे दालन उघडणे (बस फॅक्टर १ फक्त गुलशन कुमार)

आता असं म्हणू नका की तो १ बस फॅक्टर गेला नि त्या संस्थाही गेल्या!
जास्त बस फॅक्टर वाल्या संस्था डब्यात गेल्या नाहीत का?
अगदी आमच्या प्रकाशरावांनी दिलेले गुढ चिकित्सा मंडळही गेलेच ना?

उलट एकटा माणूस पेटून जे काही करू शकतो ते खासच असते. फक्त ते ‘पेटणे’ आवश्यक आहे.
पॅशन महत्वाची… ती असेल तर जग इकडचे तिकडे करणे अशक्य नाही… पण ते स्फुल्लींग जोवर चेतवले जात नाही… तोवर कोळसाही इतर कोळश्यासारखा तसाच काळाच दिसतो. पण पेटला की इतरांनाही पेटवतो, असे नाही का वाटत?
वेगळ विचार हवा… राजे हो हा वेगळा विचार महत्वाचा आहे!
दर वेळेला त्या वेगळ्या विचारातून काही येईलच असे नाही… पण म्हणून ‘वेगळा विचारच नको’ असे आजिबात नको इतकेच!
आणि च्यामारी नाहीच जमले, तर नाही जमले. पुढे कसे जमेल हे तरी पाहता येईल!

एडिसननी नाही का हजार बल्ब बनवून पाहिले?

विचार नि तत्वे एक आहेत हे तर पाहिले ना? बास तर मग!
आपण हजार प्रकारे प्रयत्न करून पाहू… अरे हजार कल्पना तर लढवून पाहू…
एक तर उपयोगी कामाची असेलच ना?

आपला
(१ पॉझिटीव्ह बस फॅक्टर)
गुंडोपंत

One Response

  1. मस्र एक बॉग (बस फॅक्टर १ – गुंडॊपंत )

तुमचा अभिप्राय नोंदवा