अहो, बुवा कुणाला नसतो?

अहो, बुवा कुणाला नसतो?

जगात असा कुणीच नाही ज्याने बाई /बुवा केला नाही.

काही माझ्या सारखे गावंढळ लोक त्याला बुवा म्हणतात,
काही गुर्जी, काही गुरूजी, शिक्षक, प्रोफेश्वर तर काही संशोधक.

पण मी माझ्या आयुष्यात कधी बुवाच केला नाही असे सरसकटपणे म्हणताच येत नाही!

आपण आपापला बुवा कधी कळून सवरून करतो तर कधी नकळत पणे करत असतो.
आपण ज्या विचारांना किंवा विचार समुहांना आपले म्हणत असतो ते खरं तर दुसर्‍या
कुणाचे तरी कधीतरी पटलेले विचार असतात. ज्या व्यक्तिचे हे विचार असतात, तोच आपला बुवा किंवा बाई.

मग बुवा कोणी केला नाही?
अगदी महात्मा गांधींनीही बुवा केला होता!

गांधींजींच्या या बुवाला बुवा न म्हणता गुरू म्हणायचे इतकेच! ही माहिती अनिल
अवचट यांच्याच २००८ साल च्या एका लेखात आहे. त्यांच्या बुवाचे नाव अमेरिकेतील विचारवंत थोरो होते.

मग एखाद्याने नास्तिक विचार मांडणार्‍यांना बुवा म्हंटले की त्यांच्या सो कॉल्ड
विचारी भक्तांना अगदी मेल्याहून मेल्यासारखे होते. कारण अनेकदा हे विचारी
बुवा, दुसर्‍या बुवाच्या विचारांचे खुजेपण दाखवूनच मोठे झालेले असतात.

फक्त ही बाब समोर आल्यावर या ‘नकळत भक्त’ मंडळींची पंचाईत होते. कारण या नास्तिक
बुवाचे विचार त्यांनी आपले म्हणून आचरणात आणलेले असतात. पण बुवाने मात्र आयुष्यात अचानक पलटी खाल्लेली असते. हा धक्काच असतो.

कारण, असे ‘नकळत भक्त’ होतांना शरणागती, (सबमिशन) नसते. हा महत्त्वाचा फरक आहे. येथे अहं मोठा ठरत असावा.

परंतु त्याच वेळी देवाला (अथवा कोणती तरी मोठी शक्ती )आणि त्या शक्तीच्या अधीन
आम्ही आहोत, हा विचार एकदा सबमिसिव्हली मान्य केला तर आयुष्य खुपच सोपे होते.

काही लोक याला पलायनवादी विचार म्हणू शकतात. परंतु पलायन करून जातो कोठे
आहे? जगण्याचे प्रयत्न तर आहेतच ना? फक्त मी इतके केले आणि त्याचे
फळ हेच? हा विचार न येता, त्या जगन्नियंत्याच्या नियमाने हे कर्म होते ते मी
केले हा विचार मनात येवू लागतो. म्हणून आयुष्य सोपे होते, असे मला वाटते.

आपला
बुवाबाज

गुंडोपंत

अहो, बुवा कुणाला नसतो?

काही लोक म्हणतात मी आजवर बुवा केला नाही!

काही तरी काय?
अहो, बुवा कुणाला नसतो?

जगात असा कुणीच नाही ज्याने बाई /बुवा केला नाही.

काही माझ्या सारखे गावंढळ लोक त्याला बुवा म्हणतात, काही गुर्जी, काही गुरूजी, शिक्षक, प्रोफेश्वर तर काही संशोधक. पण मी माझ्या आयुष्यात कधी बुवाच केला नाही असे सरसकटपणे म्हणताच येत नाही!

आपण आपापला बुवा कधी कळून सवरून करतो तर कधी नकळत पणे करत असतो. आपण ज्या विचारांना किंवा विचार समुहांना आपले म्हणत असतो ते खरं तर दुसर्‍या कुणाचे तरी कधीतरी पटलेले विचार असतात. ज्या व्यक्तिचे हे विचार असतात, तोच आपला बुवा किंवा बाई.

मग बुवा कोणी केला नाही? अगदी महात्मा गांधींनीही बुवा केला होता! गांधींजींच्या या बुवाला बुवा न म्हणता गुरू म्हणायचे इतकेच!

ही माहिती अनिल अवचट यांच्याच २००८ साल च्या एका लेखात आहे. त्यांच्या बुवाचे नाव अमेरिकेतील विचारवंत थोरो होते.

मग एखाद्याने नास्तिक विचार मांडणार्‍यांना बुवा म्हंटले की त्यांच्या सो कॉल्ड विचारी भक्तांना अगदी मेल्याहून मेल्यासारखे होते. कारण अनेकदा हे विचारी बुवा, दुसर्‍या बुवाच्या विचारांचे खुजेपण दाखवूनच मोठे झालेले असतात. फक्त ही बाब समोर आल्यावर या ‘नकळत भक्त’ मंडळींची पंचाईत होते. कारण या नास्तिक बुवाचे विचार त्यांनी आपले म्हणून आचरणात आणलेले असतात.

पण बुवाने मात्र आयुष्यात अचानक पलटी खाल्लेली असते. हा धक्काच असतो. कारण, असे ‘नकळत भक्त’ होतांना शरणागती, (सबमिशन) नसते. हा महत्त्वाचा फरक आहे. येथे अहं मोठा ठरत असावा.

परंतु त्याच वेळी देवाला (अथवा कोणती तरी मोठी शक्ती )आणि त्या शक्तीच्या अधीन आम्ही आहोत, हा विचार एकदा सबमिसिव्हली मान्य केला तर आयुष्य खुपच सोपे होते. काही लोक याला पलायनवादी विचार म्हणू शकतात.

परंतु पलायन करून जातो कोठे आहे? जगण्याचे प्रयत्न तर आहेतच ना? फक्त मी इतके केले आणि त्याचे फळ हेच? हा विचार न येता, त्या जगन्नियंत्याच्या नियमाने हे कर्म होते ते मी केले हा विचार मनात येवू लागतो. म्हणून आयुष्य सोपे होते, असे मला वाटते.

आपला

बुवाबाज

गुंडोपंत

नास्तिकांना पण बुवा लागतोच हो!

नास्तिकांना पण बुवा लागतोच हो!

आपल्या विचाराचा कुणी तरी आहे, ही जाणीव जरा सुखदच असते ना… आणि मग, जो तो बुवा आपापल्या विचारांचे कळप तयार करत असतो. काही लोक ‘आपण स्वतंत्र आहोत’ अश्या भ्रमाने त्या त्या कळपात सामील होतात.

मग हे नास्तिक बुवा मोठे होत जातात. अवचट, नारळीकर आणि काय पाडगावकर काय आहेत?

हे पण एक बुवाच आहेत, आणि आपल्या परीने नास्तिकांची बुवाबाजीच करत आहेत – ! पाडगावकर (आता) एके काळचे, नास्तिकांचे गाजलेले बुवा! पण अचानक या नव्या करारा च्या भाषांतरात आत्मिक समाधान मिळाल्याची घोषणा करून, त्यांनी त्यांच्या मागे मागे जाणार्‍यांचा पार ‘पोपट’ करून टाकला! ;) )

आता ज्याच्या मागे गेलो, तो बोलविता बुवाच असे करायला लागल्याचे उघड झाल्याने पोपटांनी पळ काढला, यात नवीन ते काय?

आपला

गुंडोपंत बुवा!

काही भरकटलेले विचार

काही (भरकटलेले?) विचार

———————-

“यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर

घडिले मानवतेचे मंदिर

परी जयांच्या दहनभूमिवर

नाही चिरा नाही पणती”

(कविता – दिव्यत्वाची येथ प्रचिती, कवि- बा. भ. बोरकर.)

हे शब्द वाचल्यावर बरेच काही विचार मनात आले.

वाटले की ज्यांनी आपले आयुष्य मानवतेला वाहिले होते

त्यांनी कुणी आपल्या मागे आपली आठवण काढत बसेल

अशी स्वप्ने पाहिली असतील? आणि त्याच्या दहनभूमीवर चिरा आणि पणती कशी असेल बरं?

दहन काही मागे राहू नये यासाठीच नसते का? अहो, झाले गेले गंगेला मिळाले!

छे! छे! इतका वरवरचा विचार बोरकरांना अपेक्षित असेल का? शक्यच नाही!

ज्या लोकांसाठी हे मानवतेचे मंदिर बांधले गेले ते त्या मंदिराच्या पुजार्‍यांनीच बळकावले आहे. त्यासाठी बलिदान देणारे दूरच राहिले आहेत नि भलतेच येवून त्या मंदिराची विटंबना करत आहेत.

तेव्हा उठा, जागे व्हा!

आणि आपल्या आधी या माहात्म्यांनी घालून दिलेल्या मार्गावर त्यांच्या दिव्य ज्ञानाच्या प्रकाशात हा मानवतेचा मार्ग अनुसरा.

असे काही बोरकरांना म्हणायचे असावे असे मला वाटून गेले.

-गुंडोपंत

मधुराष्टकम् अथवा मधुराष्टक ही भगवान कृष्णावर, कवि श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचलेली एक सुंदर संस्कृत रचना आहे. कवि श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकातील आंध्र प्रदेशातील विजयनगर या राज्याचे राजे श्री कृष्णदेव यांच्या दरबारातील कवि होत. यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनिय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धांत, रहस्य संस्कृत या सह त्यांनी अनेक साहित्यिक अशी निर्मिती केली. मधुराष्टक या भक्तीरसपूर्ण भजनात, कृष्णप्रेमात सगळेच कसे मधूर होते याचे नितांत सुंदर वर्णन आहे. हे भजन जौनपुरी रागात गायले जाते.

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||१||

वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||२||

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||३||

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||४||

करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||५||

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||६||

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||७||

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||८||

जी ए कुलकर्णी

रक्तचंदन वाचले, अर्थात परत!

आता काजळमाया घेतले आहे. जी एं चे पुस्तक एकदा घेतले की त्यातले ते गूढ गढूळजग आपल्या मनावर दाटून राहते. विशेषत: त्यातला एकाकीपणा कधी कधी भयावह वाटतो.
म्हणूनच काजळमाया घ्यायचे टाळत होतो… पण आता घेतलेच आहे वाचायला.
काजळमाया मधले जग अजून गूढ गहीरे वाटते. जी एं ची पुस्तके वाचणे म्हणजे जुनाट एकाकी विहिरीत मिट्ट काळोख्या रात्री, एकटेच उतरून गेल्यासारखे वाटते.
तरीही त्यातली पात्रे कधी ना कधी आपल्याला भेटून गेल्यासारखी वाटतात. कधी त्यांची आपुलकी वाटते.

बदलत्या काळात कदाचित गणेशवाडीभटाने ताम्हणात अंडी आणली तर काय विशेष? असे म्हणून नवीन पीढीला संदर्भ लागतही नसतील, पण त्यातल्या मानवी जाणीवा माणसे एकमेकांपासून जास्तच दूर गेल्यामुळे आज जरा जास्तच लागू आहेत यात शंका नाही.

यात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.

<strong><u>यात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.
</u></strong>
सांगतो ना, अगदी तुमच्यासाठी सु-स्पष्ट करुन सांगतो.
<strong>अहो, झक मारण्याचाच नाही, अजून जे काय मारता येईल ते मारण्याची वेळ आली आहे या मराठीच्या विभागांची.
</strong>
का बरं?
कारण नवीन तंत्रज्ञान व त्याचा उपयोग करून मराठी भाषेला काही मदत करणं हे यांचे काम आहे. आपण जे काही कर सरकार ला देतो त्यातला पैसा वापरून कुलगुरु त्यांच्या वातानुकुल हपीसात बसतात. मग त्यांनी काय करायचे आहे? कुलगुरूंनी  खरी दिशा द्यायची आहे विद्यापीठाला.  कुलगुरूंनी  विद्यापीठाचे कार्य दूरदर्शीपणे हाताळायचे आहे. कुलगुरूंनी आपल्या विद्यापीठाचा रिसर्च जागतिक कसा होईल, हे पाहायचे आहे. * आपले विद्यापीठ जागतिक स्पर्धेत कुठे आहे आजमावायचे आहे. त्या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असुन आपला ठसा उमटेल हे पाहायचे आहे. *सर्व  कुलगुरूंनी इ.स. २०२० मध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठे कमीत कमी २०% जागतिक विद्यार्थी पैसे भरून शिकायला येतील अशी वेळ आणायची आहे. त्यासाठी धोरणीपणे निर्णय घ्यायचे आहेत. जगाला बदलत्या परिस्थितीत पुढे कोणते अभ्यासक्रम योग्य ठरतील हे पाहून ते आखुन घ्यायचे आहेत. ते आधुनिक कसे राहतील हे पाहायचे आहे. ते अभ्यासक्रम सर्वोत्कृष्ठ दर्जानेच चालतील/चालवले जातील याची ऑडिट यंत्रणा उभारायची आहे. इतर विद्यापीठांशी संधान साधायचे आहे. त्यांचे विद्यार्थी आपल्या कडे मराठी शिकायला येतील हे पाहायचे आहे. त्यासाठी मराठीतले काम व त्याचा उपयोग याचा जागतिक प्रचार करायचा आहे. आज एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी किमान ५ लाख रुपये फी देतो. विद्यापीठात दर वर्षी ६०,००० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आले तर किती पैसा वाहील? * त्या पैशातून अजून सुवीधा आणि मराठी समाजाला/भाषेला पुढे काय उपयुक्त राहील यांची साद घायची आहे. ते धोरण कसे पुर्ण करायचे हे पाहायचे आहे. शासनाला त्यांच्या उच्च शिक्षण धोरणात आपल्या बाजूला वळवायचे आहे. यातले काही दूरवर तरी घडतांना दिसते आहे का?? उरले मराठी चे विभाग आणि त्यांचे प्रमुख- यांनी तर जीवच द्यावा चमचाभर पाण्यात. कोणत्या विद्यापीठाच्या मराठी विभागाने आजवर मराठी भाषेच्या संगणकीकरणात आपला हातभार लावला आहे? * किती डॉक्टरेट चे रिसर्च थेसिस मराठी भाषा आणि संगणकीकरण यावर आले आहेत? * मराठी भाषेच्या संदर्भात किती रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत?
* मराठी भाषा व इतर भाषांचे आक्रमण कसे थोपवता येईल यावर काय काम झाले आहे?
* मराठी इतर भाषिकांना सुलभतेने शिकता यावी यासाठी किती विभांगांनी काय प्रयत्न केले आहेत?
* मराठीच्या चांगल्या प्रसिद्धीसाठी मराठी विभागांनी काय धोरण राबवले आहे?
* इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना भाषिक गोडी लावण्यासाठी काय करता येईल ही पाहिले का कधी?
* मराठी शाळांचे भविष्य सुखरूप कसे राहील यावर काही काम? – (कसे करणार? यांचीच मुले सेंट झेवियर्स ला शिकतात हो!)

हे सोडा!
* पुणे, शिवाजी, उत्तर महाराष्ट्र आणि दिल्ली या विद्यापीठांतील मराठी विभागांचे, पुढील १० वर्षात मराठीसाठी काय करणार याचे काही धोरण तरी जागेवर आहे का?

हे वरील सर्व मुद्द्यांवर काम करणे हे या मंडळींचे काम नाही का?
सरकार (आणि पर्यायाने आपणही) त्यांना विभागिय राजकारण करण्यसाठी पैसा पुरवते का?

असे ते दिव्य एचओडी, प्राध्यापक आणि त्यांचे संत साहित्या वरचे थेसिस – इंद्रायणीत बुडा आणि बुडवा त्यांना!

सौरभदा,
आता मला सांगा, यातले काही घडते आहे का? नाही काहीच दिसत नाही, कधे ऐकलेही नाही!
का? कारण आम्ही झक मारतो आहोत!

<strong>आता कळले ? </strong>

आपला संतापलेला
गुंडोपंत

गुगल आणि मराठी भाषांतर

गुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही! देवनागरीच असली तरी नाही! पण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे. http://www.google.com/intl/hi/help/faq_translation.html#newlangs या दुव्यावर पाहिले असता, आप अनुवाद के लिए अतिरिक्त भाषाओं को समर्थन कब देंगे? असा प्रश्न दिसला. त्याचे उत्तर खालील प्रमाणे; हम दूसरी भाषाओं को समर्थन देने के लिए कार्य कर रहे हैं और जैसे ही स्वचालित अनुवाद हमारे मानकों पर खरा उतरेगा, हम उन्हें प्रस्तुत कर देंगे. यह कहना कठिन है कि इसमें कितना समय लगेगा, क्योंकि समस्या जटिल है और हर भाषा खुद अपनी खास चुनौतियाँ प्रस्तुत करती है. नए सिस्टम विकसित करने के लिए, हमें भारी मात्रा में द्विभाषी पाठों की आवश्यकता है. अगर आपके पास भारी मात्रा में ऐसे द्विभाषी पाठ हैं जिसका आप योगदान करना चाहते हैं, तो कृपया हमें बताएँ. मग, आता आपण मराठी माणसांनीच यांना मदत केली पहिजे असे वाटले. त्या मदती साठी आपले नाव नोंदवा http://www.google.com/intl/hi/help/faq_translation.html#newlangs या दुव्यावर जाऊन Suggest a feature or give feedback हा पर्याय निवडा Suggestions and Feedback मध्ये जाऊन मराठी भाषेसाठी विचारणा करा आणि भाषांतर तसेच मराठीच्या इतर मदतीसाठी आपली इच्छा आहे असे लिहा.

* संतापः पुणे विद्यापीठाचा (व इतरही )मराठी विभाग झक मारत बसला आहे का? अशी शंका मनात आल्याशिवाय राहिली नाही!

आजच्या घडीला भारतात ‘पिन कोड नुसार गाव तेथे चर्च’ असा कार्यक्रम व्हॅटिकन व ऍव्हेंजलिस्ट चर्चने आखला आहे.

 

 

 

 

 

 

संजय सोनवणी लिखित किस्त्रीम २००६ च्या दिवाळी अंकात आलेला एकच शंकराचार्य हवेत हा लेख वाचनात आला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि पोटतिडिकेने लिहिलेला हा लेख महत्त्वाचा आहे असे वाटते.

लेखात उल्लेखलेले अनेक मुद्दे पटले. शंकराचार्य आणि पीठे यांच्या विषयी अनेक प्रकारची माहिती दिली आहे. त्यातील भांडणे ही बाब नवीनच कळली. उद्या हिंदुच उरले नाहीत, तर ही मंडळी त्यांच्या आश्रमाचे काय करणार आहेत असा प्रश्नही माझ्या मनात आला. तात्कालीन फायद्यासाठी वापरून घेणारे राज्यकर्ते आणि त्यांना वापरू देणारे महंत ही कीड आपले मन उदास करून टाकते.आज

निर्नायकी स्वरूपात आलेला हा समाज एकत्र बांधलाच पाहिजे यात शंका नाही. एकतर अति मवाळ किंवा थेट त्रिशुळ नाचवत फिरणारे अतिरेकी, हे पाहिले की अतिशय वाईट वाटते. त्यात कोणत्याही घटनेचा फायदा घेवून हिंदुच कसे वाईट आहेत हे दाखवण्याचा परदेशी माध्यामांचा घाट पाहिल्यावर चीड येते. सर्बियातल्या अतिरेकी ख्रिश्चन कारवाया आणि मुस्लीम कत्तली, माध्यमातून शक्यतोवर पुसून टाकल्या जातात. ओरिसातले धर्मांतर म्हणजे यांना हक्क वाटतो. त्याला विरोध म्हणजे मानवतेला विरोध असतो. परदेशात ख्रिश्चन धर्माला पुढे आणण्यासाठी जे काही उपाय चालले आहेत ते पाहुन थक्क व्हायला होते. असा संघटित प्रयत्न आपण कधी करणार आहोत या विचाराने अस्वस्थ व्हायला होते.

आजच्या

घडीला भारतातपिन कोड नुसार गाव तेथे चर्चअसा कार्यक्रम व्हॅटिकन ऍव्हेंजलिस्ट चर्चने आखला आहे. उत्तर भारत हा हिंदु हब आधी निकामी केला पाहिजे, हा अजेंडा आखला गेला आहे. या साठी इन्कल्चरेशन नावाचे हत्यार वापरले जाते. म्हणजे सर्व व्यवहार हिंदुंप्रमाणेच करावयाचे पण त्यात हळूच ख्रिश्चनिटी गोवायची. त्यासाठी सर्व नावेही जाणीव पूर्वक हिंदु वापरायची. चर्च ला कृष्णालय म्हणायचे वगैरे वगैरे. असा ठराव भारतातील सर्व आर्च बिशप्स ने मिळून २००० साली केला आहे असे वाचण्यात आले. ही माहिती मला क्रुसेड वॉच नावाच्या एका संकेत स्थळावर मिळाली. बहुतेक माजी केंद्रिय मंत्री यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते.

कोरिया

या देशाची परिस्थिती पाहिल्यावर हे धर्मांतराचे लोण दूर नाही, याची जाणीवही अतिशय अस्वस्थ करते. परंतु त्यातही महर्षी महेश योगी, आनंद मार्ग किंवा चिन्मयानंद मिशन सारखी लोकं ही ज्योत अजूनही तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हीच समाधानाची बाब.

नरेंद्र महाराजांनीही धर्मांतरीत होवून ख्रिश्चन झालेले परत हिंदु करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी मोहिम घेतली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. या लेखनाला अजून प्रसिद्धी मिळायला हवी असे जाणवून गेले. तसेच हा लेख हिंदी भाषेतही प्रसिद्ध व्हावा असे वाटते. तो त्या त्या ऑडियंस पर्यंत पोहोचेल.

.

फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते का?

फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते का?

की त्याचे डिस्ट्रॅक्शन – उपद्रव मुल्यच जास्त होऊन बसते आहे?

पहा एम टी एन एल चे स्थळ http://www.mtnl.net.in/ – नेव्हिगेशन साठी स्थळ कसे “नसावे” याचा हा आदर्श आहे!

मुळात या एम टी एन एल च्या स्थळावर माणूस का येईल?
१. बिल भरणे – तत्संबंधी माहिती
२. नंबरचा शोध -डिरेक्टरी

या पैकी काही पहिल्या २ क्लिच्क् मध्ये सापडत नाही.
आणि त्रासदायक फ्लॅश ‘न्यु’ आपले लक्ष विचलित करत राहतात.

मला वाटते भारतातली आमच्या सारख्या सामान्यांची परिस्थिती आणि

नेटचा वेग पाहता स्थळ सहजतेने उघडणारे असवे.

त्यात टेक्स्टचा वापर असावा.

माझ्या मते ‘वाय जनरेशन’ स्थळ उघडायला १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर तोवर दुसर्‍या स्थळावर निघून जाते.

तुमचे मत काय?

आपला
गुंडोपंत